चीनमधील भूकंप बळींची संख्या १२७ वर

बीजिंग

उत्तर- पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा शक्तिशाली भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपात आतापर्यंत १२७ जणांचा मृत्यू झाला असून ७०० हुन अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी होती. या शक्तिशाली भूकंपात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून मालमत्तेचे देखील प्रचंड नुकसान झाले.

या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. शक्तिशाली भूकंपामुळे ग्रामीण रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, ज्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि दूरसंचार व्यवस्था देखील बंद पडली आहे. भूकंपामुळे जिशिशनमधील ६,३८१ घरांचे नुकसान झाले आहे. गान्सू प्रांतातील जिशिशान काउंटी, दहेजिया, कांगडियाओ गावात भूकंपानंतर बचाव कर्मचारी नागरिकांसाठी घरे शोधत आहेत. उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतातील जिशिशान काउंटीच्या दहेजिया गावात भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी रहिवाशांसाठी तंबू उभारले आहेत. गान्सू प्रांतातील जिशिशन परगण्यातील दाहेजिया येथे भूकंपानंतर पहाटे रहिवाशांनी आगीभोवती उभे राहून थंडीपासून बचाव केला. बचाव कार्यात थंडीमुळे अडथळे येत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top