चीनमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरही हादरले

बीजिंग

चीन-किर्गिस्तान सीमेवर काल रात्री ११.३९ वाजता तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र दक्षिण शिनजियांगमध्ये २२ किलोमीटर खोलवर होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. चीनमधील भूकंपाच्या धक्क्यांनी भारतातील दिल्ली-एनसीआरदेखील हादरले.

चीनमधील उरुमकी कोरला काश्गर यिंग आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भूकंपानंतर वूशी भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. अनेक ठिकाणी लोक त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले. भूकंपाचा परिणाम रेल्वेसेवेवर देखील झाला. काही वेळासाठी रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. भूकंपाचा एक व्हिडीओदेखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये घरे आणि जमीन हलताना दिसत आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top