चीनमध्ये बंजी जंप मारणार्या ५६ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू

बीजिंग

चीनमधील जगातील सर्वात उंच बंजी जंप प्लॅटफॉर्मवरून उडी मारल्यानंतर एका ५६ वर्षीय जपानी पर्यटकाचा मृत्यू झाला. या पर्यटकाला अनेक वर्षांपासून श्वासोच्छवासाची समस्या होती. मात्र तरीही रविवारी या पर्यटकाने मकाऊ टॉवरवरून ७६४ फुटांवरून उडी घेतली. यावेळी त्याला श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

चीनमधील मकाऊ टॉवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच टॉवर आहे. येथे एजे हॅकेटच्या स्कायपार्कमध्ये बंजी जंप आणि इतर क्रीडा प्रकार चालवले जातात. या कंपनीच्या वेबसाइटवर, ग्राहकांना कोणत्याही क्रीडा प्रकारात सहभागी होण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय स्थितीची माहिती देण्याची सूचना आहे. हृदयाच्या समस्या, उच्चरक्तदाब, मधुमेह आणि पूर्वीच्या शस्त्रक्रिया झालेल्यांना बंजी जम्पिंग करता येत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top