चीनमध्ये महामार्ग खचला २४ जणांचा मृत्यू! ३० जखमी

बीजिंग- चीनच्या दक्षिणेकडील प्रांत ग्वांगडोंग प्रांतात बुधवारी पहाटे पावसामुळे महामार्गाचा काही भाग खचला. या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले. चीनच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली आहे. देशात पाच दिवस कामगार दिनाची सुट्टी असताना ही घटना घडली.
गुआंगडोंग प्रांतातील मेझौ शहरातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना मीझी येथील मेझौ डाबू एक्सप्रेसवेवर पहाटे २.२० वाजताच्या सुमारास घडली. एक्स्प्रेस-वेचा १७.९ मीटर लांबीचा भाग खचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघात होताच सुमारे २० वाहने खाली गेली, त्यामध्ये ५४ लोक अडकले होते.
दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून गुआंगडोंग प्रांताच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि गारपिट सुरू आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पूर आला होता. प्रत्यक्षदर्शीनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, रस्त्याचा काही भाग कोसळण्याआधी तेथून जात असताना त्यांना मोठा आवाज आला आणि त्यांच्या मागे अनेक मीटर रुंद खड्डा दिसला. रस्त्याच्या तुटलेल्या भागाबरोबरच महामार्गाच्या खालची जमीनही खचलेली दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top