चीनमध्ये हिमवृष्टी आणि बर्फाळ वादळाचा इशारा

बीजिंग

नव्या वर्षातील पहिल्या थंडीमुळे चीनमध्ये वादळी वारे आणि तीव्र हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे, असा इशारा चीनच्या राष्ट्रीय वेधशाळेने दिला आहे. याबाबत राष्ट्रीय हवामान केंद्राने एक अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, काही दिवसांतच चीनमध्ये जोरदार थंडीला सुरुवात होईल. यावेळी देशातील तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. भारताच्या मध्य आणि पूर्वेकडील भागात देखील थंडीची लाट असेल.

राष्ट्रीय हवामान केंद्राने म्हटले आहे की, जोरदार थंडीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण चीनमधील काही भागांवर उद्या बर्फवृष्टी आणि हिमवादळेही कोसळतील. थंडीची लाट पाहता महापालिकेने चीनमध्ये ब्ल्यू अलर्ट जारी केला आहे. मंगोलिया, शांक्सी, हेबेई, जिलिन, लिओनिंग आणि शीतलहरीने प्रभावित दक्षिण चीनच्या अनेक भागांमध्ये २३ जानेवारीपर्यंत तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. शीतलहरीच्या प्रभावामुळे मध्य आणि पूर्व चीनमधील बहुतांश भागात जोरदार वारे वाहतील. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top