चीनही पुढील वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोबोट पाठवणार

बीजिंग- अलीकडेच भारताने चांद्रयान-३ मोहीम फत्ते करून जगभराची वाहवा मिळवली.मात्र भारताच्या या यशामुळे त्याचा शेजारी देश चिंतेत पडला आहे.त्यामुळेच चीनने आता चांगई-६ या आपल्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे.पुढील वर्षांतील चीनची ही महत्त्वाकांक्षी मोहीम रोबोटिक असणार आहे.
‘चायना नॅशनल स्पेस अ‍ॅडमिनि स्ट्रेशन’ या चिनी अंतराळ संशोधन संस्थेने परवा शुक्रवारी या रोबोटिक मोहिमेची घोषणा केली.या अंतराळ संशोधन संस्थेने सांगितले की, ही चंद्रावरील चीनची रोबोटिक मोहीम असेल.या मोहिमेचा उद्देश चंद्राच्या दुर्गम भागातून म्हणजेच दक्षिण ध्रुवावर नमुने परत आणण्याचा असणार आहे.आतापर्यंत याबाबतची माहिती कुणालाही नाही.चीन चांगई – ६ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागातील एटकेन बेसिनमध्ये उतरविणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top