चीन आता मालदीवच्या समुद्रात सोने शोधणार

माले
मालदीवच्या संसदीय निवडणूकीत मोहंमद मोईज्जू पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी चीनसाठी लाल गालिचा अंथरला आहे. मालदीवच्या हिंदी महासागरात सोने व इतर खनिजे शोधण्याचा परवाना चीनला देण्यात आला आहे.
राष्ट्राध्यक्ष मोइज्जूंनी चीनला मालदीवच्या हद्दीतील हिंदी महासागराच्या समुद्रतळाचे सर्वेक्षण आणि संशोधनाचा परवानगी चीनला दिला आहे. चीनच्या लष्करी शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या बरोबरच चीन चे लष्कर मालदीवच्या लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देणार आहे.

श्रीलंकेने चीनच्या संशोधक जहाजांवर बंदी घातल्यानंतर चीनने हिंदी महासागरात आपले वर्चस्व राखण्यासाठी तसेच खनिज संशोधन करण्यासाठी मालदीव बरोबर जवळीक साधली आहे. चीनकडे हिंदी महासागराच्या अनेक भागांत संशोधन परवाना आहे. २०११ मध्ये चीन खनिज भांडारासाठी सागरी तळाचा शोध घेण्याचा हक्क मिळवणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक झाला. इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटीने हिंदी महासागरात सागरी तळाच्या १० हजार चौ.किमी क्षेत्रातील पॉलिमेटिलिक सल्फाइडच्या संशोधनासाठी चीनला १५ वर्षांचा परवाना दिला. पॉलिसमेटॅलिक सल्फाइड सर्वात मौल्यवान खनिजापैकी एक असून ते सागरी तळावर ज्वालामुखीय स्फोटाच्या आसपास आढळते. यात सोने, चांदी, शिसे, जस्त आणि तांबे मिळते. मालदीवच्या परवानगीमुळे चीनचे शोधक जहाज मालदीवला तळ तयार करून हे काम करू शकेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top