चॅट जीपीटीला आता ‘भारत जीपीटी’चा स्वदेशी पर्याय

बंगळुरू- आता बंगळुरूतील एका कंपनीने चॅट जीपीटीला पर्याय बनवला आहे.दिल्लीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट-२०२३ वरील ग्लोबल पार्टनरशिपमध्ये कोरोव्हर कंपनीने ‘भारत जीपीटी’ हा स्वदेशी एआय पर्याय सादर केला.हे एआय भाषेचे मॉडेल चॅट जीपीटीपेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे.या मॉडेलला १२ भारतीय आणि १२० परदेशी भाषा समजतात, तर चॅट जीपीटीला फक्त ९५ भाषा समजतात. चॅट जीपीटी प्रामुख्याने इंग्रजीमध्ये काम करते.

भारत जीपीटी डेटा,प्रतिमा,ऑडिओ,व्हिडिओ, नकाशे मजकुरासह अनेक माध्यमांचा वापर करू शकते, तर चॅट जीपीटी केवळ मजकुरावर प्रक्रिया करते. त्यासाठी अमेरिकन किंवा ब्रिटिश उच्चार आवश्यक नाहीत.भारत जीपीटी इंटरनेटद्वारे माहिती संकलित करते आणि इतर विश्वसनीय स्रोतांकडून ती अद्ययावत करू शकते.ते प्रदेश,डोमेन,सेक्टर अशी तथ्यांवर आधारित माहिती सादर करते.

या कंपनीने दावा केला आहे की,भारत जीपीटी प्रश्नांची ९० टक्के अचूक उत्तरे देते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा डेटा देशातच राहील. यामध्ये एक इनबिल्ट पेमेंट गेटवे असेल, ज्याद्वारे तत्काळ पेमेंट शक्य होईल. आयआरसीटीसी, एलआयसी,एनसीपीआय, आयजीएल, भारत इलेक्ट्रॉनिक्स यांनी भारत जीपीटीचा प्रायोगिक वापर सुरू केला आहे. हवामानशास्त्राच्या अंदाजांमध्ये त्याचा वापर होतो.तसेच हायड्रोलॉजिकल मॉडेल्सच्या आधारे आठवडाभर आधी पुराचा अंदाज वर्तवणे शक्य आहे. कृषी प्लॅटफॉर्मद्वारे स्क्रीनवरच शेतातील पीक, क्षेत्रफळ व मालकीचीही माहिती मिळू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top