चेंबुरच्या ‘शंकरालयम’मध्ये आज महाकुंभाभिषेकम सोहळ्याचे आयोजन

मुंबई – चेंबूरमधील प्रती शबरीमाला समजल्या जाणाऱ्या मुंबईतील ‘शंकरालयम’ येथे उद्या बुधवार १ मे रोजी आद्य जगद्गुरू बदरी शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंद तीर्थ महा स्वामीगळ यांच्या हस्ते महाकुंभाभिषेकम सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शंकरालयमचे अध्यक्ष जयंत लापसिया यांनी दिली.

ज्या भाविकांना केरळमधील अय्यपाच्या म्हणजेच शबरीमाला देवस्थानाला जाणे शक्य होत नाही. ते भाविक चेंबूरच्या ‘शंकरालया’ला भेट देतात. अय्यपाच्या मूर्तीला दर १२ वर्षांनंतर उर्जावान करावी लागते. त्यामुळे २००२ आणि २०१४ मध्ये शंकरालयम येथे महाकुंभाभिषेकम सोहळा केला जातो. यंदा या सोहळ्याचे तिसरे वर्ष असून देशभरातील विविध मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यात देशाचे अटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी,त्रावणकोर राजघराण्याच्या युवराज्ञी आणि तिरुवनंतपुरमची महाराणी थंब्रत्ती, शापूरजी आणि पालनजीचे व्यवस्थापकीय संचालक शापूरजी, देशाचे शास्त्रीय सल्लागार डॉ.आर चिंदबरम, महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अय्यर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

चेंबूरमध्ये २००२ मध्ये चार मजली भव्य अशा प्रसादरूपी इमारतीमध्ये शंकरालयाची स्थापना करण्यात आली. या मंदिरात धर्म आस्था (अध्याया), एकम्बरेश्वरार (शिवा) भाणि कामाक्षीदेवी अशा तीन देवतांचा अधिवास असल्याचे मानले जाते. संस्थेकडून वर्षभरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. मंदिरातील तळ मजल्यावर सहा हजार चौरस फुटांचे सभागृह भजन, कीर्तन, नामसंकीर्तन, सत्संग अशा विविध कार्यक्रम होतात. तसेच अन्य मजल्यांचा वापर सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामूहिक प्रार्थना, धर्मादाय, धार्मिक कार्यक्रमासांठी केला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top