Home / News / चैत्र वारीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला २ कोटींचे उत्पन्न

चैत्र वारीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला २ कोटींचे उत्पन्न

पंढरपूर-पंढरपूर – चैत्री यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केल्यामुळे यंदा मंदिर समितीला तब्बल २ कोटी ५६...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पंढरपूर-पंढरपूर – चैत्री यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केल्यामुळे यंदा मंदिर समितीला तब्बल २ कोटी ५६ लाख ५५ हजार ५५ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम १ कोटी २९ लाख ८१ हजार २६७ रुपयांनी अधिक असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. यंदाच्या उत्पन्नात लाडू प्रसाद विक्री, देणगी, भक्तनिवास भाडे, पूजा, फोटो विक्री, हुंडीपेटीतील रक्कम, तसेच सोने-चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.

Web Title:
संबंधित बातम्या