छत्तीसगडमध्ये अपघात ९ जणांचा मृत्यू! २४ जखमी

बेमेतरा :

छत्तीसगडमधील बेमेतरा येथे काल रात्री उशिरा एका पिकअपने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये ५ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. २३ हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रायपूर एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. बेमेत्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काठिया गावात हा अपघात झाला.

सिमगाजवळील तिरैया गावात छठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ३५ हून अधिक लोक पिकअपमधून गेले होते. परतत असताना रात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. हे सर्व पाथरा गावचे रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच बेमेतराचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा, एस. पी. रामकृष्ण साहू आणि आमदार दीपेश साहू जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि गंभीर जखमींना रायपूर एम्समध्ये पाठवण्याची व्यवस्था केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top