छत्तीसगडमध्ये चकमक तीन नक्षलवादी ठार

रायपूर :

सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी आणि १ पुरुष नक्षलवादी ठार झाला. पोलिसांनी शस्त्रे, दारूगोळा आणि इतर नक्षल संबंधित साहित्य जप्त करण्यात केली.

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये बेलम गुट्टा टेकड्यांजवळ शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक झाली. याविषयी अधिकाऱ्याने सांगितले की, विनोद कर्मा, राजू पुनेम, विश्वनाथ आणि गुड्डू तेलम यांच्यासह २०-२५ सशस्त्र नक्षलवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर झारखंड पोलिस आणि कोब्रा युनिटने बेलम गुट्टा हिल्सजवळ संयुक्त शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी ही चकमक झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top