छत्तीसगडमध्ये चकमक ४ नक्षलवादी ठार

सुकमा – छत्तीसगडच्या सुकमा इथे आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी किमान ३ ते ४ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यातील गोगुंडा भागात राखीव दलाची गस्त सुरू होती. त्यावेळी त्यांची इथल्या जंगल भागात असलेल्या नक्षलींबरोबर चकमक उडाली. सुरक्षा दलाने जखमी नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्याचीही कारवाई सुरु केली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top