छत्तीसगड-ओडिशा हायवेवर कारची ३ वाहनांना धडक

  • तीन जणांचा मृत्यू

जगदलपूर :

छत्तीसगड-ओडिशा राष्ट्रीय महामार्ग- ३० वर बोरिगुमा येथे काल भरधाव कारने रिक्षा आणि दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे.

विजापूर गावाजवळ बोरीगुमाच्या ४ किलो मीटर आधी भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यानंतर ऑटो आणि अन्य एका दुचाकीस्वाराची धडक झाली.अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. रिक्षाचेही मोठे नुकसान झाले. कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घुसली. धडकल्यानंतर चालक कार सोडून पळून गेला. अपघात होताच जवळपासचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही जखमींवर कोरापूट जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top