Home / News / ‘छावा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज, छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा ‘या’ दिवशी पाहता येणार मोठ्या पडद्यावर

‘छावा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज, छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा ‘या’ दिवशी पाहता येणार मोठ्या पडद्यावर

Chhaava Trailer: अभिनेता विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी...

By: Team Navakal

Chhaava Trailer: अभिनेता विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा लूक खूपच जबरदस्त पाहायला मिळत आहे. 3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दमदार डायलॉग, कलाकारांचा लूक चाहत्यांचे मन जिंकत आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विकी कौशल पूर्णपणे उठून दिसत आहे. त्याच्या भारदस्त आवाजातील डायलॉग्स आणि शत्रूविरोधात लढतानाच आक्रोश प्रेक्षकांच्या चित्रपटाबद्दलच्या उत्सुकतेत भर घालत आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांवर येते.  तर दुसरीकडे औरंगजेब देखील दख्खन ताब्यात घेण्याच्या तयारीने लढाईच्या मैदानात उतरल्याचे दिसून येते. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा!’, मौत के घुंघुरु पहन कें नाचते हैं हम औरंग’, ‘छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है, और शेर के बच्चे को छावा’, असे दमदार डायलॉग्स ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात.

या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर औरंगजेबची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना साकारत आहे. 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या