छोट्या व्यापाऱ्यांना केंद्राचा दिलासा जीएसटी रिटर्न भरण्यापासून सूट

नवी दिल्ली – देशभरातील छोट्या व्यावसायिकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा आहे.आता छोटे व्यावसायिक किंवा दुकानदारांना केंद्र सरकारकडून नवीन वर्षाची भेट देण्यात आली.आता दोन कोटी रुपयांपर्यंतची वार्षिक उलाढाल असलेल्या छोट्या करदात्यांना जीएसटीआर-९ म्हणजेच वार्षिक विवरणपत्र भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

आतापर्यंत छोट्या व्यावसायिकांना हा फॉर्म वार्षिक रिटर्नसाठी भरावा लागत होता.सामान्य करदाता म्हणून नोंदणी केलेल्या प्रत्येक व्यक्तीला यापुढेही फॉर्म जीएसटीआर-९ भरावा लागेल तर आता छोट्या व्यापाऱ्यांना हा फॉर्म भरावा लागणार नाही.अर्थ मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्सवर ट्विट करून ही माहिती दिलीअर्थ मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे की,गेल्या पाच वर्षात जीएसटी रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत ६५ टक्के वाढ झाली असून एप्रिल २०२३ पर्यंत १.१३ कोटी झाली आहे.जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत करदात्यांची संख्या १.४० कोटींवर पोहोचली आहे,जी एप्रिल २०१८ मध्ये फक्त १.०६ कोटी होती. तर एप्रिल २०१८ मध्ये जीएसटीआर – ३ बी फाइल करणाऱ्यांची संख्या ७२.४९ लाखांवरून एप्रिल २०२३ पर्यंत १.१३ कोटी झाली असून नोव्हेंबरमध्ये मासिक जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रुपये होते.उल्लेखनीय आहे की चालू आर्थिक वर्षात मासिक सकल जीएसटी संकलन १.६० कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची ही सहावी वेळ आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top