जगभरात महागाई चीनमध्ये स्वस्ताई

बीजिंग- चीन ही जगातील दुसर्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे.मात्र याच चीनमध्ये जगापेक्षा वेगळे दिवस आले आहेत.जगभरात महागाईने जनता त्रस्त असताना चीनमध्ये वस्तू आणि सेवांना मागणीच नाही.वस्तूंचे दर धडाधड कोसळत चालल्याने अर्थशास्त्राच्या भाषेत स्वस्ताईचे दिवस आले आहेत.

चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यातील सीपीआय म्हणजेच ग्राहक किंमतीचा निर्देशांक ०.५ टक्के इतका नोंदविला आहे.हा गेल्या तीन वर्षातील निच्चांक आहे. तसेच चीनमधील तरुणांची बेरोजगारीसुद्धा मोठी आर्थिक समस्या बनली आहे.त्यामुळेच अर्थव्यवस्थेतील मागणी घटली आहे.ही स्थिती फेब्रुवारी महिन्यांपासून आहे.ऑगस्टमध्ये थोडी सुधारणा झाली, पण ऑक्टोबरमध्ये पुन्हा सीपीआय घटू लागला.ही परिस्थिती आधी फक्त वस्तूंपुरती मर्यादित होती. मात्र आता ती सेवाक्षेत्रातही पोहचली आहे.त्यामुळे मागणीत वाढ होऊन वस्तु, सेवांचे दर अधिक खाली जाण्यापासून रोखावेत, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top