जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्तीचा ११४ व्या वर्षी मृत्यू

काराकास – दक्षिण अमेरिका खंडातील व्हेनेझुएला देशातील रहिवासी असलेल्या जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे नुकतेच निधन झाले.जुआन व्हिसेंट पेरेज मोरा असे या व्यक्तीचे नाव असून ते ११४ वर्षांचे होते. जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून जुआन विसेंट पेरेज मोरा फेब्रुवारी २०२२ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली होती. त्यावेळी त्यांचे वय १२२ वर्ष २५३ दिवस होते.

व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी ट्विटरवरून जुआन यांच्या मृत्यूची माहिती दिली. जुआन यांचा जन्म २७ मे १९०९ रोजी झाला होता. त्यांना ११ मुले, ४१ नातवंडं, पणतू,१८ परतुंडं आणि १२ ग्रेट- ग्रेट ग्रँड चिल्ड्रन आहेत. जुआन व्यवसायाने शेतकरी होते. कठोर मेहनत, वेळेवर झोप घेणे आणि रोज एक ग्लास ऊसापासून बनलेली दारू पिणे हे त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य असल्याचे त्यांनी सांगितले.ते पोलीस अधिकारी होते.१९३८ मध्ये जुआन यांनी एडिओफिना गार्सिया नावाच्या महिलेशी विवाह केला. त्यांच्या पत्नीचे १९९७ मध्ये निधन झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top