जपानची कंपनी भारतात आयफोन बॅटरी बनवणार

नवी दिल्ली – मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी जपानची कंपनी आता भारतात अ‍ॅपल आयफोनसाठी बॅटरी तयार करणार आहे. जपानी इलेक्ट्रॉनिक पार्ट्स उत्पादक टीडीके कॉर्प कंपनी लिथियम-आयन बॅटरी सेल तयार करणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली.

तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘एक्स’ वर माहिती देताना सांगितले की, अ‍ॅपलच्या उत्पादनात विविधता आणण्याच्या आणि काही उत्पादन कार्ये चीनपासून दूर हलविण्याच्या चालू प्रयत्नांचा हा एक भाग आहे, ज्यात भारत एक महत्त्वपूर्ण चालक म्हणून उदयास आला आहे.अ‍ॅपलने २०१७ मध्ये सुरुवातीला विस्रोन आणि नंतर फॉक्सकॉन च्या माध्यमातून भारतीय उत्पादनात प्रवेश केला. टेक जायंट सध्या भारतातील एकूण १४ पुरवठादारांसोबत सहकार्य करते आणि एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून भारतीय बाजारपेठेशी असलेल्या वचनबद्धतेवर जोर देते.

टीडीके उत्तरेकडील हरियाणा राज्यात अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारणार असून या निर्णयामुळे या भागात हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील,असे माहिती तंत्रज्ञान उपमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडियाच्या घोषणेत अधोरेखित केले आहे. टीडीकेने तयार केलेल्या लिथियम आयन बॅटरी सेलचा पुरवठा अँपलच्या नामांकित लिथियम-आयन बॅटरी असेंबल सनवोडा इलेक्ट्रॉनिक्सला केला जाईल, जो आधीच भारतात कार्यरत आहे. सनवोडा इलेक्ट्रॉनिक्स सध्या विविध जागतिक बाजारपेठांमधून बॅटरी सेल आयात करते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top