जपानच्या शिकोकू बेटावर ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप

टोकियो- जपानच्या शिकोकू बेटाजवळ काल बुधवारी रात्री ११.१४ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे तीव्र हादरे बसले. शिकोकू बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.तसेच त्सुनामीचाही धोका नसल्याचे ‘द जपान टाईम्स’ने वृत्तामध्ये म्हटले आहे.मात्र, कधीही विस्कळीत न होणारी शिंककासेन ही अतिवेगवान बुलेट ट्रेनही या भूकंपामुळे विलंबाने धावली.

जपानमधील कोची आणि एहिम प्रीफेक्चर्सच्या काही भागांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले.ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. ६.४ रिश्टर स्केल हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप होता.या भूकंपाचा केंद्रबिंदू बंगो चॅनेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.क्युशू आणि शिकोकू बेटांना वेगळे करणारा हा परिसर आहे. यासह जपानच्या पश्चिम भागामध्ये भूकंपाचे हादरे बसले.महत्त्वाची बाब म्हणजे एहिम प्रीफेक्चरमध्ये असलेल्या शिकोकू इलेक्ट्रिक पॉवरच्या इकाटा न्यूक्लिअर प्लांटला या हादऱ्यामुळे कोणताही धोका पोहोचलेला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top