जपानमध्ये लँडिंग दरम्यानविमानाने पेट घेतला

टोकियो – जपानच्या टोकियो विमानतळावर मंगळवारी धावपट्टीवर उतरताना (लँडिंग) विमानाने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगिच्या ज्वाळा उठताना दिसू लागल्या. सुदैवाने सुरक्षा कर्मचार्‍यांनी वेगाने हालचाली करीत विमानातील सर्व ३७९ प्रवाशांना वेळीच सुरक्षितपणे विमानाबाहेर काढले. त्यामुळे जिवीतहानी झाली नाही.
जपानमधील ‘एनएचके’ या वृत्तसंस्थेने या विमान अपघाताचे वृत्त दिले आहे. त्यानुसार धावपट्टीवर जपानच्या सीमा सुरक्षा दलाचे एक छोटे विमान आधीपासून उभे होते. त्यावेळी धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली होती. परिणामी लँडिंग करताना धावपट्टीवर आधीपासून उभ्या असलेल्या कोस्ट गार्डच्या विमानाशी त्याची जोरदार धडक झाली त्यामुळे आगीचा भडका उडाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top