जम्मूतील खोदकामात सापडल्या १२ व्या शतकातील दुर्मिळ दोन मूर्ती

जम्मू- जम्मूजवळच्या भोर कॅम्पमध्ये सुरू असलेल्या खोदकामात १२ व्या शतकातील भगवान शंकर आणि देवी इंद्राणीच्या दोन मूर्ति सापडल्या आहेत,अशी माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.या मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे.
मानवी रूपातील देवी इंद्रायणी हिची मूर्ती ५५ किलो ग्राम वजनाची आणि २८ × १३.५ इंच आकाराची असून भगवान शंकराची मूर्ती ही २१×१४ इंच आकाराची असून ४० किलो वजनाची आहे. पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक संगीता शर्मा यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने भोर कॅम्पमधील खोदकामाच्या भेट दिली असून त्यांनी दोन्ही दुर्मिळ ताब्यात घेतल्या आहेत.या मूर्तींचे पुरातत्व विभाग जतन करणार आहे.या मूर्ती १२ व्या शतकातील असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top