जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी ११:५७ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल होती, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपाचा केंद्र जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड भागात ५ किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपात कोणत्याही प्रकारची जिवित किंवा वित्त हानी झाली नाही. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल देखील जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात सलग ४ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू लडाखचा कारगिल भाग होता. अनेक ठिकाणी लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top