जम्मू काश्मीरमध्ये लवकरच हलक्या बर्फवृष्टीची शक्यता

श्रीनगर :

काश्मीरमध्ये पुढील आठवड्यात हलका बर्फ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे खोऱ्यातील प्रदीर्घ कोरडेपणा संपेल, असे हवामान विभागाने काल सांगितले. २४ जानेवारीपर्यंत कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून २७ जानेवारीनंतर संध्याकाळी सामान्यतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. २५ जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरच्या उंच भागात हलक्या बर्फवृष्टीची शक्यता आहे, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

‘चिल्ला-ए-कलन’ ३१ जानेवारीला संपेल. त्यानंतर २० दिवसांच्या ‘चिल्ला-ए-खुर्द’ (लहान थंडी) आणि १० दिवसांच्या ‘चिल्ला-ए-बच्छा’सह थंडी कायम राहील. श्रीनगर उणे ४.९ अंश सेल्सियस, काझिगुंड उमे ५ अंश सेल्सियस, गुलमर्ग उणे ३.६ अंश सेल्सियस, पहलगाम उणे ५.३ अंश सेल्सियस, कोकेरनाग उणे १.४ अंश सेल्सियस व कूपवाडा उणे ५ अंश सेल्सियस, अशा तापमान नोंदी नोंदविल्या गेल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top