Home / News / जम्मू काश्मीरात लष्कराच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार

जम्मू काश्मीरात लष्कराच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार

अखनूर – जम्मू काश्मीरच्या अखनूर मध्ये आज दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळाबार केला . सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.जम्मू काश्मीरमधील डोंगराळ व सीमेलगतच्या भागात गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. आज सकाळी ७ वाजता बटाल भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर तीन वेळा गोळीबार केला. सुरक्षा दलांनी त्यानंतर परिसराला वेढा घालून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जम्मूत व्यापक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांनी गोळीबार करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.