जम्मू-काश्मीर राज्यात अर्धा दिवस सुट्टी जाहीर

श्रीनगर
राम मंदिर सोहळ्यानिमित्त जम्मू-काश्मीरमध्येही उत्साहाचे वातावरण झाले आहे. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त जम्मू-काश्मीरमधील सरकारी कार्यालयांना उद्या सोमवारी अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर जम्मू-काश्मीर सरकारने अर्धा दिवस सुट्टीची घोषणा केली आहे.जम्मू शहरातील ऐतिहासिक रघुनाथ मंदिरात तीन दिवसीय उत्सव साजरा केला जात आहे. या मंदिरात आज सकाळी पुजारी सतपाल रैना यांनी सुंदरकांड पठण केले. या मंदिरातील भजन आणि कीर्तनसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली. भजनाच्या तालावर काही भाविकांनी नृत्यही केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top