Home / News / जय मल्हार’च्या जयघोष करत भाविकांची जेजुरी गडावर गर्दी

जय मल्हार’च्या जयघोष करत भाविकांची जेजुरी गडावर गर्दी

जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाची आज सोमवती अमावस्या यात्रा सुरु झाली. या यात्रेत ‘येळकोट येळकोट जय...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाची आज सोमवती अमावस्या यात्रा सुरु झाली. या यात्रेत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात करत भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यासोबत भाविकांनी भंडारा उधळल्यामुळे जेजुरी भंडाऱ्याने न्हाऊन निघाली होती.आज श्रावणातील शेवटचा सोमवार आणि सोमवती अमावस्या होती. तब्बल ७२ वर्षांनी असा योग आल्याने भाविकांनी रविवारपासूनच जेजुरीत गर्दी केली. आज पहाटेची पूजा, महाभिषेक नंतर मंदिर गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला होता. गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता देवाच्या उत्सवमूर्तीची पालखी जेजुरी गडावरून कऱ्हा स्नानसाठी नेली. सायंकाळी ४ वाजता कऱ्हेकाठी विधिवत स्नान सोहळा झाला .

Web Title:
संबंधित बातम्या