Home / News / जर्मनीतील ‘बॉश’च्या ७ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

जर्मनीतील ‘बॉश’च्या ७ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

बर्लिन – बॉश या जर्मनीस्थित बहुराष्ट्रीय कंपनीने वाढता तोटा पाहता आपल्या ७ हजार कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

बर्लिन – बॉश या जर्मनीस्थित बहुराष्ट्रीय कंपनीने वाढता तोटा पाहता आपल्या ७ हजार कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात बॉश कंपनी आर्थिक उद्दिष्ट गाठू शकत नाही असा अंदाज आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या जर्मनीतील कारखान्यात कामगार कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमारे ७ हजरा कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त केले जाईल,असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन हारटंग यांनी सांगितले.

सन २०२३ मध्ये कंपनीने ९८ अब्ज डॉलरचा महसूल कमावला होता. विक्रीवरील लाभ ५ टक्के एवढा होता. मात्र यावर्षी अपेक्षित लाभ घटून ४ टक्क्यांवर येणाची शक्यता आहे. तर आगामी २०२६ मध्ये ७ टक्के नफ्याचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी कामगार कपातीचा निर्णय घ्यावा लागत आहे,असे हारटंग यांनी सांगितले. वाहन उद्योगात उपयुक्त ठरणारी डीस्क, ब्रेक पॅड, सेन्सर आणि अपघात सुरक्षा यंत्रणा अशी अनेक उत्पादनांची निर्मिती बॉश कंपनी करते.

Web Title:
संबंधित बातम्या