Home / News / जळकोटमधील तिरु नदीवरील पूल गेला वाहून! २८ गावांचा संपर्क तुटला

जळकोटमधील तिरु नदीवरील पूल गेला वाहून! २८ गावांचा संपर्क तुटला

लातूर : लातूर जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. यात लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील तिरू...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

लातूर : लातूर जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. यात लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील तिरू नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला. यामुळे पुलावरून होत असलेली वाहतूक बंद झाल्याने जवळपास २८ गावांचा संपर्क तुटला.

एक वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नवीन पुलाचे काम अद्यापही सुरू झाले नाही म्हणून नदीवर पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. मात्र पूल मजबूत आणि टिकावू नसल्याने वाहून गेला. जवळपास नदीच्या पलीकडील गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, गुंजी, नळगीर, उदगीर, जळकोट, बाराहाळी, मुखेड आदी गावांचा संपर्क तुटला. नदीतील पाणी कमी झाल्यानंतर वाहतुकीसाठी रस्त्याचे काम करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने दिली.

Web Title:
संबंधित बातम्या