Home / News / जळगाव-पुणे विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून दररोज

जळगाव-पुणे विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून दररोज

जळगाव – एप्रिल महिन्यात गोवा- जळगाव आणि हैदराबाद-जळगाव पुणे या विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या विमान सेवांना प्रवासी वर्गाकडून...

By: netadmin
Social + WhatsApp CTA

जळगाव – एप्रिल महिन्यात गोवा- जळगाव आणि हैदराबाद-जळगाव पुणे या विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या विमान सेवांना प्रवासी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता २७ ऑक्टोबरपासून या सेवा दररोज सुरू होणार आहेत,
अशी घोषणा विमान कंपन्यांकडून करण्यात आली आहे.दरम्यान,
जळगाव मुंबई ही तीन दिवस सुरू असलेली विमानसेवासुद्धा दररोज सुरू करावी, बंद पडलेली जळगाव अहमदाबाद सेवा देखील सुरू करावी अशी मागणी येथील व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.

या विमानसेवांना जळगावकरांकडून इतका प्रतिसाद मिळत आहे की
गोवा,हैदराबाद,पुणेसाठी सध्या तिकीटे उपलब्ध नसल्याचे चित्र दिसत आहे.
यामध्ये सर्वाधिक मागणी ही पुण्यासाठी आहे.हे लक्षात घेता सध्या आठवड्यातून तीन दिवस असलेली ही सेवा २७ ऑक्टोबरपासून दररोज उपलब्ध होणार आहे.त्यासाठी बुकींग देखील सुरू करण्‍यात आले आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या