जव्हारच्या दर्‍याखोर्‍यातील वटवाघूळांची संख्या घटली

जव्हार – पालघर जिल्ह्यातील घनदाट वनसंपदेची ओळख असणार्‍या जव्हार तालुक्यातील दर्‍या खोर्‍यात आढळणार्‍या वटवाघूळांची संख्या घटली आहे.वृक्ष आणि जंगलतोडीमुळे हा निसर्ग मित्र वटवाघूळ दुर्मिळ होत चालला आहे.

जंगलातील अनेक फळे चोखून फळबियांची वाहतुक करून पर्यावरणाला मदत करण्याचे काम हा वटवाघूळ निशाचर प्राणी करत असतो.जगात ११०० प्रकारचे वटवाघूळ असून त्यापैकी २०० वटवाघूळ हे ‘मेगाकायशेटरेस’ या प्रकारात मोडतात.त्यांना ‘फ्लाइंग फॉक्स’ असे म्हणतात.त्यांचा वेग प्रतितास २५ ते ३० किलोमीटर इतका असतो. त्यांनी खाल्लेल्या फळांच्या बिया त्यांच्या विष्ठेतून सर्वदूर पसरतात.अशा निसर्गाच्या महत्वपूर्ण घटकाला अंधश्रद्धा म्हणून झटपट श्रीमंत होण्यासाठी,
तंत्रमंत्रासाठी नष्ट केले जात आहे.त्यामुळे त्यांची संख्या घटत चालली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top