जागतिक हवामान बदलामुळे काश्मिरातील केशर उत्पादन घटले !

श्रीनगर- जगातील सर्वांत महागडा मसाला म्हणून ओळखल्या जाणार्‍या केशरची शेती मोठ्या प्रमाणात एकट्या काश्मिरात केली जाते.पण अलीकडे हेच महागडे उत्पादन जागतिक हवामान बदलांमुळे घटत असल्याचे दिसत आहे.कमी पाऊस आणि वाढती उष्णता यामुळे केशरसाठी लागणारी जमीन कोरडी आणि कडक बनत चालली आहे. त्याचा परिणाम केशरच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. देशातील एकूण ९० टक्के केशर काश्मीरमध्ये पिकत असतो. ‘क्रॉकस ‘ नावाच्या वनस्पतीच्या फुलांमधील पुंकेसर म्हणजेच केशर असतो.ही फुले खुडून त्यातील पुंकेसर नाजूकपणे बाजूला केला जातो. १ किलो केशर गोळा करण्यासाठी २ ते ३ लाख फुलांतील पुंकेसर निवडावे लागते.आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो केशराची किंमत साधारणपणे १५०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १ लाख २४ हजार ८२८ रुपये इतके आहे.मात्र वाढते तापमान आणि पावसाची कमतरता यामुळे केशर उत्पादन घटत चालले आहे. पंपोर भागात केशरची शेती घरोघरी केली जाते.पण आता उत्पादन कमी होऊ लागल्याने हे केशर उत्पादक चिंतेत दिसत आहेत. १९९६ मध्ये काशीमध्ये ५७०० हेक्टर क्षेत्रावर केशरची लागवड केली होती.हे प्रमाण २०२० मध्ये ११२० हेक्टर इतके घटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top