Home / News / जालन्यात ट्रकचालकावर गोळीबार

जालन्यात ट्रकचालकावर गोळीबार

जालना- जालन्यातील छत्रपती संभाजी नगर रोडवरील टोलनाक्याजवळ काल रात्री ट्रक चालकावर चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञाताने गोळीबार केला. मोहम्मद रिझवान हसाबुद्दीन...

By: E-Paper Navakal

जालना- जालन्यातील छत्रपती संभाजी नगर रोडवरील टोलनाक्याजवळ काल रात्री ट्रक चालकावर चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञाताने गोळीबार केला. मोहम्मद रिझवान हसाबुद्दीन असे गोळीबारात जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. मोहम्मद रिझवान हसबुद्दीन हा ट्रकमध्ये भंगार माल घेऊन मुंबईहून जालन्याकडे निघाला होता. तो जालन्यातील छत्रपती संभाजी नगर रोडवरील टोलनाक्याजवळ एका हॉटेलवर चहापाणीसाठी थांबला होता. तेव्हाच आरोपी व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर ३ गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये मोहम्मद रिजवान असामुद्दिन याच्या कंबरेला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून जुन्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमीच्या फिर्यादीवरून जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या