जावलीतील कुसुंबीचे काळेश्वरी मंदिर महिनाभर बंद राहणार

सातारा-जिल्ह्यातील जावली तालुक्यातील कुसूंबी येथील काळेश्वरी मंदिरातील देवीच्या मूर्तीचा वज्रलेप विधी पार पडणार आहे. त्यासाठी हे काळेश्वरी मंदिर २८ डिसेंबरपासून भाविकांना दर्शनासाठी महिनाभर बंद राहणार आहे, अशी माहिती माहीती काळेश्वरी देवी ट्रस्टच्या विश्वस्तांनी दिली आहे.

या मंदिर बंद काळात भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता २९ डिसेंबर रोजी मंदिरात होमहवन होणार असून यावेळी मातेचे देवत्व कलशात स्थापन करण्यात येणार आहे.या कलशाचे दर्शन भाविकांसाठी खुले राहणार आहे.मात्र मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश मिळणार नाही.
वज्रलेपाचा विधी नववर्षातील १७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.यानंतर १८ जानेवारीपासून काळेश्वरी मातेच्या मूर्तीच्या पुनर्रस्थापनेचा विधी पुढील पाच दिवसाकरिता चालणार आहे.वज्रलेपाच्या काळात काळेश्वरी मंदिरात दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या काळात मंत्रजप सुरू राहणार आहे,अशी माहिती काळेश्वरी देवी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top