Home / News / जीप विहिरीत पडून 7 वारकर्‍यांचा मृत्यू

जीप विहिरीत पडून 7 वारकर्‍यांचा मृत्यू

जालना – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या जालनातील वारकर्‍यांवर परतीच्या मार्गावर काळाने घाला घातला. वारकर्‍यांची जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या...

By: E-Paper Navakal

जालना – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या जालनातील वारकर्‍यांवर परतीच्या मार्गावर काळाने घाला घातला. वारकर्‍यांची जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत पडून 7 वारकर्‍यांचा मृत्यू झाला. तर तिघांना वाचवण्यात यश आले.
जालना ते राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ काळी पिवळी जीप वेगात असल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटले आणि जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत पडली. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या सहाय्याने जीप विहिरीतून बाहेर काढण्यात आली. मात्र जीपमधील 7 जणांचा मृत्यू झाला होता. तीन जण जिवंत आहेत. त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही दुर्घटना आज सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या अपघातातील प्रवासी पंढरपूर येथून बसने जालना येथे परतले. तिथून गावी जात असताना त्यांच्या जीपला अपघात झाला.

Web Title:
संबंधित बातम्या