जुन्या पेन्शनसाठी पुन्हा एल्गार शिक्षक अधिवेशनावर धडकणार

नागपूर :

जुनी पेन्शन, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीकडून ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

विद्यार्थी व शिक्षक हिताच्या विविध मागण्या असून शिक्षकांवर अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे लादली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षकांना फक्त शिकविण्याचेच काम करू द्या. तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्य शिक्षकांचा महामोर्चा राज्य नेते उदय शिंदे , राज्याध्यक्ष विजय कोंबे , राज्य सरचिटणीस राजन कोरेगावकर यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे. शिक्षकांनी माेठ्या संख्येने माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, सरचिटणीस प्रशांत अकोत , मारोती वरोकार, विभागीय उपाध्यक्ष गोपाल सुरे , विजय टोहरे, संजय इंगळे, अनिल पिंपळे, किशोर कोल्हे, मंगेश देशपांडे आदींनी केल्याचे प्रसिद्धी प्रमुख दिनेश बोधनकर यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top