जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना कर्करोग

मुंबई
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कारागृहात असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना कर्करोगाचे निदान झाले असून कर्करोगाच्या आजारावर उपचार करण्यासाठी अंतरिम जामीन मिळावा, अशी विनंती करणारी याचिका त्यांनी विशेष न्यायालयात दाखल केली. खासगी डॉक्टरांनी केलेल्या चाचण्यांमध्ये नरेश गोयल यांना कर्करोग झाल्याचे उघड झाले आहे. सध्या त्यांना तात्काळ अंतरिम जामीन मिळणेे शक्य नसून 20 फेब्रुवारीपर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे.
हळूहळू वाढणाऱ्या कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी जामीन मिळावा,अशी याचिका गोयल यांनी न्यायालयात केली आहे. ईडीने त्यांच्या अंतरिम जामीनाच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यामुळे न्यायालयाने गोयल यांच्या वैद्यकीय अहवालाची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश जेजे रुग्णालयाच्या डीनना दिलेे. या वैद्यकीय मंडळाने त्यांच्या आजाराबाबतचा अहवाल 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असे न्यायालयाने सांगितले.
गेल्या महिन्यात मनी लॉन्ड्रिंगप्रकरणाची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी गोयल यांना खासगी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यास परवानगी दिली होती. या गंभीर आजारासह गोयल यांना 35 सेमी ते 40 सेमीचा हर्नियादेखील आहे. गोयल यांनी प्रथम कर्करोगासाठी पीईटी स्कॅन करणे आवश्यक आहे, ज्याच्या आधारावर डॉक्टर शस्त्रक्रिया, केमोथेरपीसह उपचारांची दिशा ठरवतील, असे त्या अर्जात लिहिण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top