जेट एअरवेज प्रकरणी अनिता गोयलना जामीन मंजूर

मुंबई – जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची पत्नी अनिता गोयल यांना मनी लाँडरिंगप्रकरणी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.काही अटींसह दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात अनिता यांची चौकशी केली होती.कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी ईडीने नरेश गोयल यांच्यासह पाच आरोपींविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणात ईडीने १ सप्टेंबरला नरेश गोयल यांना अटक केली. १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जेट एअरवेजचे बँक खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडित म्हणून घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेने दिलेले कर्ज थकीत होते. त्यानंतर करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर खात्यांत वळवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top