जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोग संबंधित सर्व खटले निकाली काढणार

वॉशिंग्टन – जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. आमच्यावर अमेरिकेत दाखल करण्यात आलेले हजारो खटले निकाली काढण्यासाठी आम्ही ६.५ अब्ज डॉलर देण्यास तयार आहोत. आगामी २५ वर्षांत आम्ही ही रक्कम देऊ असे या कंपनीने काल सांगितले. या कंपनीच्या टाल्कबेस्ड उत्पादनांमुळे अंडाशयाचा कर्करोग झाला आहे, असा तक्रारदारांचा आरोप आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या प्रस्तावावर तक्रारदारांनी अद्याप कोणताही प्रतिक्रिया दिली आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीविरोधात अमेरिकेत अनेकांनी तक्रार दाखल केलेली होती. या कंपनीच्या टाल्कबेस्ड वेगवेगळ्या उत्पादनामुळे आम्हाला अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा दावा, तक्रारदारांनी केला आहे. कित्येक वर्षांपासून या खटल्यांवर सुनावणी चालू आहे. त्यामुळेच हे सर्व खटले निकाली काढण्यासाठी या कंपनीने आता ६.५अब्ज डॉलर देण्याची तयारी दाखवली आहे. आगामी २५ वर्षांत आम्ही हे पैसे देऊ, असा प्रस्ताव कंपनीने ठेवला आहे.
एलटीएल मॅनेजमेंट ही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची उपकंपनी आहे. याच उपकंपनीला दिवाळखोर घोषित करून तक्रारदारांना ६.५ अब्ज डॉलर्स देण्याचा विचार जॉन्सन अँड जॉन्स या कंपनीचा आहे. याआधी या कंपनीने असाच प्रयत्न दोन वेळा केलेला आहे. मात्र उपकंपनीला दिवाळखोर जाहीर करून हे खटले निकाली काढण्यास न्यायालयाने दोन्ही वेळा नकार दिलेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top