जोतिबा डोंगरावर ५ डिसेंबरला काळभैरव जन्मकाळ सोहळा

पन्हाळा

पन्हाळा येथील श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर ५ डिसेंबर रोजी श्री काळभैरव जन्म काळ सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी पहाटे ४ वाजता घंटानाद, पहाटे ४ ते ५ पाद्य पूजा, पहाटे ५ ते सकाळी ६ काकड आरती, सकाळी ६ ते ९ लघु रुद्र अभिषेक, सकाळी ९ ते १० पोषाख व अलंकार महापूजा, सकाळी १० ते १ पुण्य हवाचन, मातृकापूजन नवग्रह पुजन, क्षेत्रपाल पुजन, होमहवन होणार आहे.

यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ५ भजनी मंडळ डवरी गीते कार्यक्रम, सांयकाळी ६ वाजता श्री. काळभैरव जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. त्यांनतर सुंठवडा वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे आणि रात्री सोंगी भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या भव्य कार्यक्रमाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन काळभैरव मंदिराच्या पुजाऱ्यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top