जो बायडन यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावाला मंजुरी

वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांव्याविरोधातील महाभियोग प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. अमेरिकन संसदेत बायडन यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावासंदर्भात निवडणूक पार पडली ज्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ २२१ मते, तर विरोधात २१२ मते पडली महाभियोग प्रस्तावामुळे बायडन यांना येत्या निवडणुकीत अडचणी निर्माण होऊ शकतात बायडन यांच्यावर त्यांचा मुलगा हंटर बायडन यांनी केलेल्या वादग्रस्त आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या आधारे औपचारिक महाभियोगाची चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला डेमोक्रेटिक पक्षाने हा निर्णय निराधार असळ्याचे मत व्यक्त केले.
डेमोक्रॅटिक पक्षाने सांगितले की, “रिपब्लिकन पक्षाने अद्याप बायडन यांच्या विरोधात कोणतेही खरे तथ्य मांडलेले नाही. महाभियोगाचा कोणताही फायदा होणार नाही, कारण अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृहात हा प्रस्ताव पडू शकतो याचे कारण म्हणजे सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची संख्या अधिक आहे.’ महाभियोग प्रस्तावाबाबत बायडन यांनी रिपब्लिकन पक्षावर टिका केली. ‘हा महाभियोग प्रस्ताव म्हणजे राजकीय स्टंट आहे. देश आणि जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्राधान्यक्रमांवर कारवाई करण्यासाठी अमेरिकन लोकांना काँग्रेसमधील त्यांच्या नेत्यांची गरज आहे. रिपब्लिकन पक्षाने युक्रेन आणि इस्रायलला पाठवण्यात येणारा निधी रोखला. तसेच त्यांनी सीमा सुरक्षा मजबूत करण्यास समर्थन दिले नाही. मी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यासाठी मी वचनबद्ध आहे,’ असे ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top