‘ज्ञानवापी’च्या तळघराच्या चाव्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपवा

*न्यायालयाने दिले आदेश

वाराणसी – वाराणसी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश ए. के.विश्वेश यांनी ज्ञानवापी संकुलात असलेल्या ‘व्यासजी का तहखाना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तळघराच्या चाव्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सुपूर्द कराव्या ,असे आदेश दिले आहेत.

यावेळी न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले की, संकुलाच्या दक्षिणेला असलेल्या व्यासजींच्या तळघराची योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले आहे.त्यामुळे वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना व्यासजींच्या तळघराचा रिसिव्हर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.हिंदू बाजूचे वकील यादव यांनी यापूर्वी म्हटले होते की, अधिकाऱ्यांनी १९९३ मध्ये तळघराला संरक्षक कडे टाकले व कुलूप लावले होते. त्याआधी तळघराचा वापर सोमनाथ व्यास या पुजार्‍याने पूजेसाठी केला होता,असा दावा यादव यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top