ज्ञानवापी मशिदीचा पुरातत्व अहवाल! सर्व पक्षांना देण्याचा कोर्टाचा आदेश

वाराणसी- ज्ञानवापी मशीदीसंदर्भात पुरातत्व विभागाने तयार केलेला अहवाल सर्व पक्षकारांना देण्याचे आदेश आज वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. हा अहवाल सार्वजनिक न करण्याची मागणी मुस्लीम पक्षाने केली होती. पुरातत्व विभागाने १८ डिसेंबर रोजी हा पाहणी अहवाल एका बंद पाकिटात न्यायालयाला सादर केला होता.
पुरातत्व विभागाने हा अहवाल चार भागांमध्ये दिलेला असून वजूखाना वगळता ज्ञानव्यापी मशीदीची पाहणी तब्बल शंभर दिवस चालली होती. या अहवालातून ज्ञानव्यापी मशीदीबाबतचे सत्य बाहेर येणार आहे. दरम्यान या संदर्भातले आणखी एक पक्षकार अंजुमनी ताजमिया यांनी हा अहवाल गुप्त ठेवण्याची याचिका दाखल केली होती. असे करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरेल असे मत हिंदू पक्षाचे वकील अनुपम द्विवेदी यांनी न्यायालयाला सांगितले होते. या दरम्यान २० जानेवारीला ज्ञावव्यापी मशीदीतल्या वजू खान्याची सफाई देखील करण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top