ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे डोंगराला ४ किमी लांब भेगा

रेक्जाविक- नैऋत्य आइसलँडमध्ये रेक्जनेस बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
लागोपाठ झालेल्या भूकंपानंतर ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने तप्त लाव्हारस बाहेर पडत होता. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तासभरात सुंधनुकुर क्रेटर नामक ज्वालामुखीच्या डोंगराला ४ किलोमीटर लांबीचा तडा गेला आहे. डिसेंबरनंतर आतापर्यंत या बेटावर सहावेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.

रेक्जनेस बेटावर शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ज्वालामुखीचा स्फोट झाला. स्फोटाचा प्रभावाने या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. लाव्हारसाचा प्रवाह ग्रिंडाविक शहराच्या दिशेने गेला नाही,ही दिलासादायक बाब बसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. रेक्जनेस बेटावर ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लाल लाव्हा मोठ्या प्रमाणात पसरला होता.या ज्वालामुखीमुळे भीतीचे वातावरण पसरले होते.डिसेंबरपासून आतापर्यंत सहाव्यांदा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.२०१० मध्ये येथे सर्वात विध्वंसक एज्जाफ्याल्ला जोकूल ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.यामुळे राखेचे प्रचंड मोठे ढग आकाशात पसरले होते आणि त्यामुळे अनेक महिने यामुळे हवाई प्रवास बंद विस्कळीत झाली होती.