झरीन खानला मोठा दिलासा अटक वॉरंट कोर्टाने रद्द केले

कोलकाता :बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानविरोधात काही दिवसांपूर्वी कोलकाता कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. पण आता मात्र कोर्टाने ते वॉरंट मागे घेत झरीनला मोठा दिलासा दिला आहे. २०१८ मधील कथित फसवणूक प्रकरणामुळे हे वॉरंट जारी करण्यात आले होते.

२०१८ साली ६ कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल झरीनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर २४ परगणा येथील काली पूजेच्या ६ कार्यक्रमांना झरीन हजर राहिली नाही. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्यावतीने नरकेलडांगा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार देण्यात आली. नरकेलडांगा पोलिसांनी सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. याच प्रकरणात कोर्टाने झरीनविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पण आता मात्र कोर्टाने ते वॉरंट रद्द केले. तपास अधिकार्‍यांनी दिलेल्या दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे हे अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. पण प्रकरणातील तथ्यांची तपासणी केल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी एक तपशीलवार आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी झरीनविरोधातील वॉरंट रद्द केले आहे, अशी माहिती दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top