झाडे न तोडता मलबार हिलच्या जलाशयाची पुनर्बांधणी करणार! मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकरांची माहिती

मुंबई- मुंबईतील मलबार हिल येथील हँगिंग गार्डनमधील झाडे न तोडता तेथील जलाशयांची पुनर्बांधणी करण्यासाठी चाचपणी केली जाणार आहे. ऐतिहासिक हँगिंग गार्डनचा विकास करताना तेथील तेथील जुनी कोणतीही वस्तू, झाडे आदी बाधित होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार असल्याची मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे,माजी नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, पालिकेने जलाशयाची पुनर्बांधणी आणि हँगिंग गार्डनचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी जलाशयाचा पुनर्विकास करताना १८९ झाडे तोडण्याचा आणि २०० झाडांचे पुनर्रोपण करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. पण त्यास स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे जलाशयाचा पुनर्विकास आणि हँगिंग गार्डनचा विकास करताना झाडे तोडली जाणार नाहीत. यासाठी तज्ञांचे मत जाणून घेऊन तशी चाचपणी केली जाणार आहे. तसेच त्याठिकाणी असलेले जुने पोस्ट कार्यालय आणि इतर काही ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्या तशाच ठेवून त्यांचा कायापालट केला जाईल. क्रॉफर्ड मार्केट परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मालवाहतुकीचे काम करणाऱ्यांना हातगाडी ऐवजी बॅटरीवर चालणारी कार देण्याबाबत सरकार विचार करत आहे. तसेच मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवित असून ठाण्यातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठिकठिकाणी फॉगिंग मशीन बसविल्या जाणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top