झिम्बाब्वेत दुष्काळामुळे तब्बल १०० हत्तींचा मृत्यू

हरारे – झिम्बाब्वेतील सर्वांत मोठ्या असलेल्या हवांगे नॅशनल पार्कमधील सुमारे १०० हत्तींचा दुष्काळामुळे मृत्यू झाला आहे,अशी माहिती आंतरराष्ट्रीय प्राणी कल्याण आणि संवर्धन संस्थेने दिली. अल निनोच्या प्रभावामुळे याठिकाणी पावसाला पाच आठवडे उशीर झाला आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे आतापर्यंत १०० हत्तींचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.हवांगे नॅशनल पार्कमधील सुमारे ४५ हजार हत्तींचे वास्तव्य असून या उद्यानातील डझनभर हत्तींचा आधीच मृत्यू झाला आहे.या उद्यानाला सरकार मदतनिधी दिला जात नसल्याने उद्यान प्रशासन तलाव खोदण्याचा प्रयत्न करत असते .पण या सर्व १०४ तलाव कोरडे पडले आहेत आहेत. पाण्याच्या शोधासाठी हे हत्ती दूरवर भटकंती करत आहेत. अनेक हत्ती कोरड्या तलावापासून ५० मीटर अंतरावर मृतावस्थेत आढळून आहेत.ते पाण्याच्या शोधात असताना मरण पावले असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या भागत भीषण दुष्काळ पडला आहे.त्यामुळे परिस्थिती फारच चिंताजनक बनली आहे,असे या झिमपार्क्सचे प्रवक्ते टिनाशे फरारो यांनी म्हटले आहे.
झिमपार्क्स हे झिम्बाब्वेतील उद्याने आणि वन्यजीव व्यवस्थापनासंदर्भातील प्राधिकरण आहे.याठिकाणी दुष्काळाचा मोठा फटका हत्ती सारख्या सस्तन प्राण्यांना बसला आहे. पाऊस लवकर पडला नाही तर अन्य वन्यजीव प्रजातींनाही या संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय प्राणी कल्याण आणि संवर्धन संस्थेने दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top