झोमॅटो कंपनीला मोठा झटका ११.८१ कोटी भरण्याचे आदेश

नवी दिल्ली- फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो कंपनीला गुरूग्रामच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मोठा झटका दिला आहे. या कंपनीला जीएसटी विभागाने ११ कोटी ८१ लाख रुपयांची कर आणि दंडाची नोटीस धाडली आहे. जुलै २०१७ ते मार्च २०२१ दरम्यान भारताबाहेरील उपकंपन्यांना प्रदान केलेल्या निर्यात सेवांच्या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

या नोटिशीत म्हटले आहे की, जुलै २०१७ -मार्च २०२१ या कालावधीसाठी ५.९ कोटी रुपयांची जीएसटी मागणी आणि ५.९ कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. झोमॅटोने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, कंपनीला केंद्रीय जीएसटी गुरुग्रामच्या अतिरिक्त आयुक्तांकडून जुलै २०१७ ते मार्च २०२१ या कालावधीसाठी ५ कोटी ९० लाख ९४ हजार ८८९ रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश मिळाला आहे. मात्र कंपनी या नोटिशीच्या विरोधात अपील दाखल करणार आहे. या कंपनीला कर्नाटकच्या जीएसटी विभागाकडूनही अशी नोटीस मिळाली आहे.त्यामध्ये कंपनीकडून २३ कोटी २६ लाख रुपयांचा कर, दंड आणि व्याजाची मागणी करण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top