टांझानियात पूर, भूस्खलनामुळे ४७ जणांचा मृत्यू, ८५ जखमी

डोडोमा

आफ्रिकेतील टांझानियाच्या उत्तर भागात पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू, तर ८५ हून अधिक जण जखमी झाले. टांझानियाची राजधानी डोडोमाच्या उत्तरेला सुमारे ३०० किलोमीटर (१८६ मैल) अंतरावर असलेल्या कटेश शहराला शनिवारी मुसळधार पावसाने झोडपले. त्यानंतर या भागात मोठा पूर आला व त्यामुळे भूस्खलन झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

सीओपी २८ हवामान परिषदेत सहभागी होण्यासाठी दुबईत आलेले टांझानियाचे अध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांनी शोक व्यक्त केला. टांझानियातील लोकांना वाचवण्यासाठी सूचना जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोमालियामध्ये मुसळधार पावसामुळे दहा लाखांहून अधिक लोक बेघर झाले असून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top