टाटांना जीवे मारण्याची धमकी आरोपीला कर्नाटकातून अटक

बंगळुरु

उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना काल जीवे मारण्याची धमकी देणार्याला मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली. ३५ वर्षीय आरोपी एमबीए पदवीधारक असून त्याला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काल मुंबई पोलिसांना फोन करून ‘रतन टाटा यांची अवस्था सायरस मिस्त्रीसारखी होईल’ अशी धमकी एका व्यक्तीने दिली होती. . सायरस मिस्त्री यांचा गेल्या वर्षी अपघातात मृत्यू झाला होता. फोन करणाऱ्याने टाटांच्या सुरक्षेत वाढ करायलाही सांगितले. त्यानंतर टाटांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. तसेच ही धमकी देणार्या आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक पथक तैनात केले. आरोपीचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर त्याला कर्नाटकातून अटक करण्यात आली.
आरोपी मूळचा पुण्याचा रहिवासी असून गेल्या ५ दिवसांपासून तो बेपत्ता होता. आरोपीला स्किझोफ्रेनिया हा आजार असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top